बेधडक मी मराठी न्यूज
शहादा:- शहादा नगर पालिकेत आजपर्यंत एकूण 86 नामांकन दाखल करण्यात आले असून त्यात 80 नामांकन ही सदस्य पदासाठी तर सहा नामांकन ही नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आली आहेत. आज पर्यंत दाखल झालेले अर्जामध्ये जनता विकास आघाडी यांनी एकत्र अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शन केले आहे. अभिजीत दादा पाटील यांच्या नेतृत्वात जनता विकास आघाडी पॅनल शहादा नगरपालिकेच्या निवडणूक मैदानात उतरले असून भाजपा पुढे मोठे आव्हान उभे केले आहे. जनता विकास आघाडीतर्फे एकूण 37 अर्ज दाखल करण्यात आले असून 33 अर्ज हे सदस्य पदासाठी तर चार अर्जही नगराध्यक्ष पदासाठी दाखल केली आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या देखील शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले होते. आज पावतो अजित पवार गटाकडून एकूण 14 अर्ज दाखल करण्यात आले असून 13 अर्ज हे सदस्य पदासाठी तर एक अर्ज हा नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष यांच्याकडून 69 अर्ज दाखल झाले असून एक अर्ज हा नगराध्यक्ष पदासाठी तर 26 अर्ज सदस्य पदासाठी दाखल झाले आहेत. शिंदे शिवसेना गटाकडून दोन तर अपक्षाकडून सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 17 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून माघारी नंतरच चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी देखील अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूकित रंग भरला जाऊन शिंदे शिवसेना गट आणखीन उमेदवार देते की काय याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. सध्या तरी निवडणुक जनता विकास आघाडी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये होणार असल्याचे चित्र आहे. नगराध्यक्ष पदासाठी तिघ पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. माघारी आणते चित्र स्पष्ट झाल्यानंतर खरी लढत व रंगत कोणामध्ये होईल हे चित्र स्पष्ट होईल.