
बेधडक मी मराठी न्यूज शहादा
शहादा :- शहरातील २३ वर्षीय युवतीचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दोन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२५ पासून दोघांकडून आळीपाळीने हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित करून युवतीची बदनामी करण्यात येत होती.
शहादा शहरातील २३ वर्षीय युवतीसोबत जयेश पटेल (२२) याची सोशल मीडियातून ओळख झाली होती. यातून जयेश याने तरुणीचा व्हिडीओ रेकॉर्डिंग करून तो मित्र हिमांशू पटेल (२१) याला दिला होता. हिमांशूयानेही पीडितेला ब्लॅकमेल केले. याप्रकरणी युवतीने सारंगखेडा पोलिस ठाण्यात ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जयेश पटेल व हिमांशू पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिमांशू पटेल यास अटक करण्यात आली आहे तर दुसरा संशयित पसार झाला आहे तपास पोलिस निरीक्षक देसले करत आहेत.