बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855

तळोदा:- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मौजे जीवननगर पु क्र सहा येथे गटविकास अधिकारी आर. डी. किरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधारे तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला .
पर्यावरण संतुलनासाठी पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत जीवननगर गोपाळपूर पुनर्वसन सहा येथे गटविकास अधिकारी आर डी किरवे,सहाय्यक गटविकास अधिकारी काशिनाथ पवार,विस्तार
अधिकारी बि.डी. निकुंभे यांचे सह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायतीचे सरपंच मोगी अमरसिंग पावरा,उपसरपंच शभरत कुपजी वसावे, बाज्या दादा वसावे, आसमानी तडवी , गुमानसिंग शंकर पावरा, कालुसिंग वसावे, आनंदा वसावे, रेवजी वसावे, शुक्राम पावरा, दिलवरसिंग पावरा,जगन वसावे, मदन वसावे, जोधा पावरा, बिया पावरा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी श्रमदानातून चार यशस्वी वनराई बंधारे तयार केलेत.
या कार्यक्रमात पर्यावरण संतुलन मृदसंधारण व जलसंधारण बाबतच्या घोषणा देण्यात आल्या.याप्रसंगी गोपाळपूर ग्रामपंचायत अधिकारी मुकेश कापुरे यांच्यासह तळोदा तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र पावरा,उपाध्यक्ष रामकृष्ण बोरसे, किसन पावरा श्री रत्नाकर शेंडे राजेश भोये यजुवेंद्र सूर्यवंशी मिलिंद पाडवी, अविनाश वसावे पूनम पाटील कल्पना राठोड विजय पाटील विजय जाधव व 35 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी श्रमदान केले.