ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची प्रक्रिया आता होणार कडक; परिवहन विभागाच्या RTO ना सूचना…

रस्त्यांवर होणारे ८० टक्के अपघाता हे वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळेच- परिवहन आयुक्त विवेक भीमनवार

मुंबई: वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविण्याची प्रक्रिया आता अधिक कडक आणि पारदर्शक होणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालक प्रशिक्षण आणि परवाना चाचणीतीला त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण चालक तयार करण्यावर परिवहन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

पक्क्या लायसन्ससाठी ऑनलाइन वेळ नोंदवणे सक्तीचे करण्यात आले आहे. या खेरीज, प्रत्येक कार्यालयासाठी चाचणीसाठी लागणारा वेळ अधिकारी उपस्थिती, कागदपत्र तपासणी आणि सीसीटीव्ही निगराणीचे कडक नियम घालण्यात आले आहेत.

रस्त्यांवर होणारे ८० टक्के अपघाता हे वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. अपघात कमी करण्यासाठी उत्तम चालक निर्माणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहना चालविण्याच्या चाचणी अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे.

 

‘सीसीटीव्ही’च्या निगराणीखालीच वाहन चालवण्याची चाचणी बंधनकारक

परिवहन विभागाकडून ‘ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक’ प्रकल्प सुरू आहे. पण, तो पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या चाचणी मार्गावर ‘सीसीटीव्ही’च्या निगराणीखालीच वाहन चालवण्याची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

संपूर्ण रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवून तपासणी समितीला उपलब्ध करून देणे कार्यालयांसाठी अनिवार्य असेल. त्यासाठी एक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना सर्व आरटीओंना दिल्या आहेत. परिवहन विभागाच्या या नव्या निर्णयामुळे परवाना चाचणी अधिक काटेकोर, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.
वाहन चालवण्याच्या चाचणीत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल तर प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काटेकोर लक्ष ठेवावे. तसेच, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण अजपैिकी पाच टक्के अर्जदारांची पुन्हा चाचणी घेण्यात यावी. त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या शेवटी सादर करावा लागणार आहे. त्यामुळे पक्का वाहन परवाना देण्यासाठी कोटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे.
पक्क्या लायसन्ससाठी चाचणी देणाऱ्या सर्व अर्जदारांना ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य. एका दिवशी किती वाहनांची चाचणी घ्यायची, कोणता वाहनप्रकार किती वेळात तपासायचा, याचे वेळापत्रक कार्यालयांना बंधनकारक केले आहे.

ज्या अधिकाऱ्यांची चाचणीसाठी नियुक्ती आहे, त्या सर्वांनी मैदानावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. चाचणी झाल्यानंतर अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये स्वतंत्रपणे केली जाणार आहे. कोणताही अर्ज तपासणीविना पुढे जाणार नाही.
परवाना प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा ‘सेवा हमी’ अंतर्गत वेळेत पूर्ण करणे संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीचे. विलंब किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार

वाहन चाचणी मागाँवर ‘सीसीटीव्ही’ निगराणी ठेवणे बंधनकारक. चाचणीच्या एकूण प्रक्रियेचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणे आणि तपासणी समितीला उपलब्ध करून देणे हे कार्यालयांचे कर्तव्य असेल.

वाहन तपासणीदरम्यान त्रुटी, अव्यवस्था किंवा गैरव्यवहार आढळल्यास तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश आहेत.

वाहन निरीक्षक, सहायक निरीक्षक किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रक्रिया बिघडवली, अपॉइंटमेंटऐवजी थेट चाचण्या घेतल्या किंवा गैरव्यवहार केला तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *