बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो.9689840855

तळोदा:- शहरातील नेमसुशिल समूहाचा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून से.नि.मुख्याध्यापक दत्तात्रय सूर्यवंशी प्राचार्य अमरदीप महाजन तालुका क्रीडा संयोजक सुनिल सूर्यवंशी मुख्या.मिलिंद कुमार धोदरे संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल संस्था समन्वयक हर्षिलभाई तुरखीया मोती बँकेचे मॅनेजर वसंत पाटील व नितीन वाणी व पत्रकार साम्राटभाऊ महाजन आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. विभाग निहाय क्रीडा प्रकारात खोखो, क्रिकेट, रनिंग, व्हॉलीबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले त्यात एकूण 350 विद्यार्थी व 80 हून अधिक शिक्षक शिक्षिका, मुख्याध्यापक, मोती बँक कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.दोन दिवशीय क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर आपले कसब दाखवत यश संपादन केले. परीक्षक म्हणून डेविड सर, अनिता पावरा, सी जी वळवी योगेश पाडवी, अमोल पाडवी, बादल वसावे, संदिप वसावे, रोहित राजपूत, अंकुश, जिजा पराडके यांनी काम पाहिले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या. पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी मुख्या.भावना डोंगरे मुख्या. गणेश बेलेकर उप प्राचार्या कल्याणी वडाळकर विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.क्रीडा कमेंट्री संदिप चौधरी सुनिल परदेशी सागर मराठे राजेश मराठे रेखा मोरे शैलेंद्र पाटील यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण कुवर यांनी मानले.