बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो.9689840855

तळोदा:- महाराष्ट्र शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमीतपणे दरवर्षी खर्च करण्यात यावा, अश्या मागणीचे निवेदन तळोदा येथे दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदार दीपक धिवरे यांना देण्यात आले. दरम्यान, संघटनेच्या मागण्यांसंदर्भात आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री. धिवरे यांनी दिले.
तळोदे येथे दिव्यांग प्रहार क्रांती संस्था तालुकाध्यक्ष मंगलचंद जैन, उपाध्यक्ष संजय शिंदे, शहर प्रमुख सुनिल भोई यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, स्थानिक आमदार-खासदार निधी शासन निर्णय क्र. १२३/प्र.क्र.९६ का. १४८२ दि.२०/२/२०२३ नुसार दिव्यांगांना मदतीसाठी ३० लाख रुपयांपर्यंत निधी वापरण्याची तरतुद आहे. तो निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा. तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांगांना दरमहा निधी १५०० वरुन वाढवून तो २५०० रु. करण्यात आला आहे. परंतु, आजही काही दिव्यांगांना १५०० रुपये प्रमाणेचं मिळतात. तरी सर्व दिव्यांगांना दरमहा २५०० रुपये मिळावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी तहसिलदार दिपक धिवरे यांनी सकारात्मक चर्चा करताना सांगितले की, यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.
निवेदनावर दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगलचंद जैन, उपाध्यक्ष संजय शिंदे, शहर प्रमुख सुनील भोई, रोनील शहा, गोपाळ पाडवी, रामचंद्र राणे, अजय पाडवी, अरुण वडाळकर, उमेश सूर्यवंशी, पंडित जवेरी, निशा साळी, जगदीश सूर्यवंशी, दर्याबाई परदेशी, चंद्रकांत कलाल, रामकृष्ण विसपुते, सुनिता शिंदे, चैताली मगरे, दीपक सूर्यवंशी, हेमंत ठाकरे, संगीता माळी, सुशील शुक्ल, बळीराम ठाकरे, शेहनाज शिकलीकर आदि. उपस्थित असून यांच्या निवेदनावर सह्या आहेत.