शिरपूर व सोनगीर टोल नाका व्यवस्थापकाने कामगारांना विश्वासात घेता केला पगार वाढ ; मनसे कामगार सेनेने दिला आंदोलनाच्या इशारा!

(बेधडक मी मराठी न्यूज ) धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर व सोनगीर टोल नाक्यावरील व्यवस्थापनाने कामगार…

धुळे-: नेर येथील जि प शाळा महादेव वस्तील शाळेने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकाविला द्वितीय क्रमांक

(बेधड़क मी मराठी न्यूज़ ) धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे : धुळे तालुक्यातील नेर येथील जि…

खंडलाय बु येथे अमरधाम शेड व बैठक व्यवस्थाचे जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

(बेधड़क मी मराठी न्यूज़) नेर (धुळे प्रतिनिधी दिलीप साळुंखे): धुळे तालुक्यातील खंडलाय बु येथे धुळे ग्रामीणचे…

द जर्नलिस्ट असोसिएशन मध्ये नाशिक शहराध्यक्षपदी युवराजसिंग राजपुत यांची फेर निवड.

नाशिक : युवराजसिंग राजपूत यांची द जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक शहर अध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली. युवराजसिंग…

अक्कलपाडा धरणाच्या रायवट पाटाचे दुरुस्तीचे अंदाजपत्रकाचे सर्वक्षण सुरू;आमदार राम भदाणे यांच्या सूचनेला यश

( बेधडक मी मराठी न्यूज ) धुळे प्रतिनिधी दिलीप साळुंखे(नेर) : अक्कलपाडा धरणाच्या पांझरा नदीवरील शिवकालीन…

सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे आवाहन

( बेधडक मी मराठी न्यूज ) नंदुरबार : वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन…

आई -वडिलांनी सोडलं मुलींच्या शिक्षणासाठी गाव…. केली नाशिक मध्ये मोलमजुरी

  नाशिक: श्री खुशाल विनायक कदम व सौ सुलभा खुशाल कदम यांची मुलगी ज्योत्स्ना.यांचे वडील इलेक्ट्रिशन…

आविष्कार २०२४ संशोधन स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे यश..

(बेधडक मी मराठी न्यूज) शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि नंदुरबार तालुका…

रस्ता सुरक्षेची मानके पाळून नागरीकांचा प्रतिसाद अवश्यक – डॉ. मित्ताली सेठी

(न्यूज बेधडक मी मराठी न्यूज, नंदुरबार)

नंदुरबार अपघात होवू नये यासाठी चांगल्या रस्त्यांसोबत उपाययोजना करणे हे शासकीय यंत्रणेचे काम आहे. नागरीकांनी देखील याला रस्ता सुरक्षेची मानके पाळून प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी केले आहे.

नंदुरबार शहरातील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ३६ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाला आज सुरवात झाली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, वाहन धारकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीबाबत व्यापक जनजागृती हाती घेतली असून, अपघातांच्या अनुषंगाने १३२ ब्लॅक आणि असुरक्षित स्थळे शोधण्यात आले आहेत, या स्थळांवर अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टर आणि अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी देखील येत्या २१ तारखेपर्यंत केली जाणार असून १४ तारखेपर्यंत याच अनुषंगाने सर्व यंत्रणांचा आढावा घेणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यावेळी म्हणाल्या. येणाऱ्या काळात वाहुतकीच्या नियमनासाठी चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा मंजुर करण्यात आली असून नागरीकांनी रस्ते सुरक्षेच्या अंमलबजावणीसाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी व्यक्त केली. दुचाकीवर हेल्मेट वापरणे, चारचाकी गाडीत सिटबेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, तसेच वाहन चालवताना मद्यपान टाळणे या चतुः सुत्रांच्या अवंलब केल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होवून रस्ता सुरक्षा अभियानास मदत होईल, असा विश्वास आजच्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला. कोरोना कार्यकाळात झालेला लोकांच्या मृत्युसंख्येपेक्षाही वर्षाकाठी रस्ता अपघातात मृत पावणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने साऱ्याच मान्यवरांनी याबाबत चिंता व्यक्त करत रस्ता सुरक्षा उपायांबाबत मंथन केले.

 

या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरीकांना सुरेक्षेसाठी शपथही देण्यात आली. महिनाभर हे रस्ता सुरक्षा अभियान सुरु राहणार असल्याचे देखील यावेळी परिवहन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल नलावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.

नंदुरबार सरकारी जमिनीवर भूमाफीयांच्या कब्जा: एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हा अधिकारी ना निवेदन!

(बेधडक मी मराठी न्यूज, नंदुरबार) नंदुरबार शहाराअंतर्गत असलेले आदिवासींचे आराध्य दैवत यामोगी माते मंदिरातील मागील बाजूस…