आई -वडिलांनी सोडलं मुलींच्या शिक्षणासाठी गाव…. केली नाशिक मध्ये मोलमजुरी

  नाशिक: श्री खुशाल विनायक कदम व सौ सुलभा खुशाल कदम यांची मुलगी ज्योत्स्ना.यांचे वडील इलेक्ट्रिशन…

आविष्कार २०२४ संशोधन स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे यश..

(बेधडक मी मराठी न्यूज) शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि नंदुरबार तालुका…

रस्ता सुरक्षेची मानके पाळून नागरीकांचा प्रतिसाद अवश्यक – डॉ. मित्ताली सेठी

(न्यूज बेधडक मी मराठी न्यूज, नंदुरबार)

नंदुरबार अपघात होवू नये यासाठी चांगल्या रस्त्यांसोबत उपाययोजना करणे हे शासकीय यंत्रणेचे काम आहे. नागरीकांनी देखील याला रस्ता सुरक्षेची मानके पाळून प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी केले आहे.

नंदुरबार शहरातील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ३६ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाला आज सुरवात झाली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, वाहन धारकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीबाबत व्यापक जनजागृती हाती घेतली असून, अपघातांच्या अनुषंगाने १३२ ब्लॅक आणि असुरक्षित स्थळे शोधण्यात आले आहेत, या स्थळांवर अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टर आणि अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी देखील येत्या २१ तारखेपर्यंत केली जाणार असून १४ तारखेपर्यंत याच अनुषंगाने सर्व यंत्रणांचा आढावा घेणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यावेळी म्हणाल्या. येणाऱ्या काळात वाहुतकीच्या नियमनासाठी चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा मंजुर करण्यात आली असून नागरीकांनी रस्ते सुरक्षेच्या अंमलबजावणीसाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी व्यक्त केली. दुचाकीवर हेल्मेट वापरणे, चारचाकी गाडीत सिटबेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, तसेच वाहन चालवताना मद्यपान टाळणे या चतुः सुत्रांच्या अवंलब केल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होवून रस्ता सुरक्षा अभियानास मदत होईल, असा विश्वास आजच्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला. कोरोना कार्यकाळात झालेला लोकांच्या मृत्युसंख्येपेक्षाही वर्षाकाठी रस्ता अपघातात मृत पावणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने साऱ्याच मान्यवरांनी याबाबत चिंता व्यक्त करत रस्ता सुरक्षा उपायांबाबत मंथन केले.

 

या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरीकांना सुरेक्षेसाठी शपथही देण्यात आली. महिनाभर हे रस्ता सुरक्षा अभियान सुरु राहणार असल्याचे देखील यावेळी परिवहन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल नलावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.

नंदुरबार सरकारी जमिनीवर भूमाफीयांच्या कब्जा: एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हा अधिकारी ना निवेदन!

(बेधडक मी मराठी न्यूज, नंदुरबार) नंदुरबार शहाराअंतर्गत असलेले आदिवासींचे आराध्य दैवत यामोगी माते मंदिरातील मागील बाजूस…

‘त्याला समजायला पाहिजे की संघाला…’; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर…

…म्हणून 21 वर्षीय तरुणाने Girlfriend च्या घरासमोर स्वत:ला उडवून दिलं; जागीच मृत्यू

Karnataka Man Blows Himself Up: या स्फोटामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा दुर्देवी…

एकतर्फी प्रेमातून ट्रेनसमोर ढकलून 20 वर्षीय तरुणीला केलं ठार, बातमी ऐकताच वडिलांनी संपवलं जीवन; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल

आरोपी सतीशविरोधात सीसीटीव्ही आणि 70 साक्षीदारांना पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलं. Source

15 चित्रपटांपैकी एकच हिट, शाहरुखसोबत दिसलेला ‘हा’ अभिनेता प्रभास, रणबीर कपूरपेक्षा श्रीमंत

Zayed Khan Net Worth: अभिनेत्याने फक्त 15 सिनेमे केले मात्र त्यातील एकच हिट ठरला पण आज…

मुंबई ते गोवा अन् चिपळूणमार्गे परतीचा प्रवास; कारचालकानं सांगितली रस्त्यांची A to Z अवस्था, हा अनुभव तुमच्यासाठी मदतीचा

Mumbai to Goa Via Chiplun : कोकणात आणि तिथून काहीसं पुढे गोव्यात रस्तेमार्गानं जायचा बेत आखत…

नववर्षाच्या आधीच ग्राहकांना दिलास, सोनं-चांदी स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ झाली जाणून घ्या Source